
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
राजूरा
राजुरा तालुक्यांत मागील काही दिवसांपासून गुन्हा मद्ये वाढ होत असून अवैध कोळसा तस्करी, गोवंश तस्करी, रेशन तांदूळ तस्करी,रेती उत्खनन,जुगार , अंमली पदार्थ, सुगंधित तंबाखू विक्रीत वाढ होताना दिसत आहे, तसेच आज मोठ्या प्रमाणात अवैध घातक शत्रसाठा जप्त केल्याने खळबळ माजली आहे.
गस्तीवर असलेल्या पोलीस चमूला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्ड येथील तीघांनी बिहार राज्यातून घातक शस्त्र आणले असून भविष्यात काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता आहे असे समजून येते.
उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सी. बहादूरे , सहा.पोलीस उपनिरीक्षक एस. दरेकर, पोलिस उपनिरीक्षक हिराचंद गव्हारे, नागोराव भेंदेकर, संदीप बुरडकर, रामा भिंगेवाड,ह्यांच्या कारवाहीत संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या कडे 1 पिस्तूल,2 देशी कट्टे,स्टील तलवार, चक्र असलेले घातक शस्त्र जप्त केले.