
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””“”””””””””””””””””””””””””””””
परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ग्लोबल अवॉर्ड टीचर रणजितसिंह डिसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
परभणी जिल्हास्थानी असलेल्या अक्षदा मंगल कार्यालयात आ. राहूल पाटील यांनी आपल्या परभणी या मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. प्रारंभी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेल्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रा. रविंद्र बनसोड यांनीही मार्गदर्शन केले.
शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर व अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
रविवार, दि. २४ जुलै २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता कौतुकास्पद असल्याचे सांगून आ. पाटील यांनी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित करणे गरजेचे असते असे म्हणाले. त्यांनी यावेळी ग्लोबल अवॉर्ड विजेते टीचर रणजितसिंह डिसले यांचेही गुणगान केले. अशा मान्यरांनी त्यासाठी केलेले अथक प्रयत्न, जिद्, चिकाटी यासारखे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत व अधिकाधिक गुणवत्ता प्राप्त करावी हाच एकमेव हेतू आमदार राहूल पाटील यांचा या मेळाव्याच्या दृष्टीने दिसून आला. अशाप्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजित करुन आ. पाटील हे आपल्या मतदारसंघातील विद्यार्थी, महिला, तरुण-तरुणींना व समस्त शेतकरी वर्गाला सातत्याने प्रोत्साहित करीत असतात. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पाचारण करुन मार्गदर्शन घडवून आणतात.