
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून द्यावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथे उपजिल्हाधिकारी साहेब उपस्थित नव्हते तरी सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन उप जिल्हाधिकारी साहेब यांचे निषेध केले तसेच स्वाभिमानी-संभाजी-ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष डाॅ गजानन माने साहेब , प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत मुळे,जिल्हाध्यक्ष बालासाहेब कदम-पाटील जवळगेकर, जिल्हाकार्याध्यक्ष विठ्ठल मुळे ,जिल्हा उपाध्यक्ष जनार्धन भालेराव सर, ता अध्यक्ष व्यंकट, कदम ता.उपाध्यक्ष महेश जाधव, तसेच इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते