
दैनिक चालु वार्ता तालुका वाडा प्रतिनिधी-मनिषा भालेराव
भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखेच्या वतीने सिध्दार्थनगर, वाडा येथील बुद्ध विहारात वर्षावासाच्या निमित्ताने प्रवचन मालिकेचे “दुसरे पुष्प” अर्पण करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा शाखेचे सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक तथा प्रवचनकार आद.प्रकाश जाधव गुरुजी यांनी “बुद्ध धम्म आणि विज्ञान” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तालुका शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आद.अतिश बागुल गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हा धम्म प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महिला उपाध्यक्षा आद.संजना गायकवाड, कार्या. सचिव आद. नरेश जाधव, महिला सचिव आयुनि.कल्पना गवई, तालुका संघटक आद.मा.तु.खैरकर गुरुजी, वाड्यातील उपासिका आद.सुमन आई थोरात, कीर्तीताई थोरात, ढवळे ताई, आयु.प्रा.किरण थोरात सर, राजेंद्र वाघचौरे, धम्मपाल ढवळे, निहार, विहार आदी उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे आयुनि.संजनाताई गायकवाड, प्रा.किरण थोरात सर व आयुनि.कीर्ती किरण थोरात यांच्या कडून स्वागत, चहापान व्यवस्था करण्यात आली. तसेच आयुनी. ईंदु राहुल जंजाल यांस कडुन फळदान प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाखेचे सरचिटणीस आयु.विनोद वाघचौरे यांनी केले.