दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी हे गाव ग्रामीण भाग मोडतो. इथे सध्या वापरापेक्षा जास्त वीजबिल येणे, वीजबिलाच्या प्रतीत चालू मीटर चे छायाचित्र नसणे (१), प्रत्यक्ष न येता वीज वापराची (Reading) नोंद करणे, वीज मीटर खराब असणे तसेच स्थानिक लाईन मन (महावितरण) कर्मचाऱ्यांकडून संशयास्पद व्यवहार अशा तक्रारी सामान्यच आहेत. अशात महावितरणचा भोंगळ कारभार नजरेत सहज खुपतो.
याच परिक्षेत्रात देऊळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले नागरिक तर सततच्या या त्रासाला कंटाळले आहेत. इल्या नागरिकांच्या सर्वात जास्त समस्या ह्या वीज मीटर खराब असणे, बिलावरील वीजमीटर चा फोटो न वाचतायेण्या जोगा असणे, तसेच जास्त वीजबिल आल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी पिळवणूक या आहेत. या विषयी आम्ही येथील एक तक्रारदार श्री. संतोष विनायक केंद्रे यांच्याशी वार्तालाप केला. त्यांनी तर गेल्या 6 महिन्यापासूनच्या वीज बिलांचा हवाला देत इथल्या भोंगळ कारभाराची जणू साक्षच दिलीय. ते म्हणतात कि, “दर महिन्याचे वीजबिल हे वापरापेक्षा जास्त येतेय. आम्ही तक्रारी केल्या पण न इथले महावितरणचे लाईनमन येथील कनिष्ठ अथवा वरिष्ठ अभियंते कोणीच या तक्रारींची दखल घेत नाहीये. शेवटी हताश होऊन आम्ही सर्व तक्रारदारांना एकत्र घेऊन एक सह्यांची मोहीम करण्याचे व त्यानंतरही जर काही उपाय नाही झाला तर माहिती अधिकाराच्या आखत्यारीत अर्ज करून संबंधित अधिकाऱ्यांना वीज मीटर मध्ये चालणाऱ्या घोटाळ्यांबद्दल उत्तरे मागवणार आहोत. आता पहा ना ह्या महिन्याचे वीजबिल आम्हाला काल आले ज्यात वीज मीटर चा फोटोच नाही तर 84,550 हे बिल मुसळे 1शिवाजी राम 2. रंगराव श्यामराव केंद्रे
3. गणपती मुंढे
4. गुणवंत केंद्रे ( मुळे ) याना बिल आले आहे (२). आम्ही कसा विश्वास ठेवायचा या बिलावर? तसेच या तक्रारी घेऊन जेव्हा आम्ही उदगीर येथील महावितरणच्या कार्यालयात जातो तेव्हा सर्वात आधी कनिष्ठ अंभियंत्यांच्या कचेरी बाहेरील कर्मचारी “साहेब बाहेर गेलेत, तुम्ही नंतर या” हे एकच पालुपद लावून पळवून लावतात. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.”
प्रामाणिकपणे वीजबिल भरणा करणाऱ्या नागरिकांना कसे लुबाडता येईल हेच इथल्या काही कर्मचाऱ्यांचे पैसे कमावण्याचे मूलभूत साधन झालेले आहे. महावितरणचे अधिकारी, अभियंते हे कार्यालयात उपलब्ध नसणे आणि त्यामुळे लोकांना आपला किमती वेळ वाया घालवत, हेलपाटे घालून नाहक मनस्ताप ओढवून घेणे हे नित्याचेच झालेय. अशा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या लाईनमन पासून ते वरिष्ठ अभियंत्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. या सगळ्या शोध प्रवासात आम्हाला जागोजागीक्ष भ्रष्टाचाराचा गंध येत गेला. कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने कसे बरबटले आहेत हे जाणवलं. मग जाणवलं कि या सर्वांच्या व परिवारातील सदस्यांच्या संपत्तीचे उत्पन्नानुसार यथायोग्य मोजमाप का होऊ नये? पुढील लेखात आम्ही काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते व रयत शेतकरी संघटनाचे उदगीर तालुका अध्यश केंद्रे प्रकाश हे पुढील सदरात आपली मते व्यक्त करणार आहेत. प्रशासनाला याचा जाब विचारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
