
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : भोर महसूल विभागातील तलाठ्याचा सोमवारी २५ जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वरवे खुर्द (ता.भोर) येथील तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. बुडताना मदतीचा धावा केला, मित्रांनी आणि स्थानिकांनी वाचवण्यासाठी प्रयत्नही केला, मात्र तरीही त्यांचा बुडून मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृतदेह मिळाला आहे.
मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय ३५, सध्या रा. नसरापूर,ता. भोर , मूळगाव रा. जहागीरमोहा, ता. माजलगाव जि. बीड ) असे बुडालेल्या तलाठ्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, महसूल कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक उमेश जगताप, वर्वेचे सरपंच निलेश भोरडे, ग्रामसेविका शाहीन इनामदार घटनास्थळी दाखल झाले.
मुकुंद चिरके हे मित्रांसमवेत रोज ट्रेकिंग आणि पोहण्यासाठी जात होते. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसमवेत वर्वे येथील पाझर तलावात पोहत असता शिर्के तलावाच्या मध्यभागी त्यांना दम लागला आणि तेथेच ही दुर्घटना घडली.