
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी
मराठवाड्यातील शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात शामिल झाले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
अगदी २ दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांनी आदित्य यांच्यासमोर मंचावर आता आपण आयुष्यभर उद्धव साहेबांसोबत असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, खोतकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने मराठवाड्यातील शिवसेना आता अधिक कमजोर झाले असल्याचे मानले जात आहे.