
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन शिल्पात, चारही सिंहात दाखवलेला हिंस्त्रपणा कशासाठी राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणणे हे षडयंत्र आहे की शिल्पकराची चूक? आणि ज्यामुळे राष्ट्राचा अपमान होत आहे, असे शिल्प का मान्य करण्यात आले? असे सवाल बाळासाहेब बाबर यांनी उपस्थित केला आहे.
पूर्वीचे राष्ट्रीय चिन्ह हे मानवतावादी, संपूर्ण प्राणिमात्रांविषयी करुणा, मंगलकामना, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव असलेला तथागत गौतम बुद्धांचा अहिंसावादी, मानवी कल्याणाचा विचार अधोरेखित करते. दरम्यान, नवे चिन्ह मूळ चिन्हाशी विसंगत आहे. भारत हा शांतताप्रिय देश असून नव्या चिन्हात हिंस्त्रपणा दाखविण्याचे कारण काय? मूळ राष्ट्रीय चिन्हात बदल करण्याचा अधिकार आहे काय, नसेल तर अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणाऱ्यांची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी. तसेच नवीन संसद भवनावर मूळ स्वरुपातीलच राष्ट्रीय चिन्ह बसवावे. अशी मागणी बाळासाहेब बाबर लोहा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना उपसरपंच बाळासाहेब बाबर , युवा नेते बालाजी गाडेकर , ॲड जगदीश पाटील आदिंची उपस्थिती होती.