
दैनिक चालू वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी
आगामी काळातील होऊ घातलेल्या गेवराई नगर परिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दि,२८ गुरुवार रोजी ठिक ११:०० वाजता ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील तक्रार निवारण समिती चे राज्य अध्यक्ष प्रा विष्णू जाधव बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे व जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत तरी गेवराई तालुक्यातील नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे तसेच वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्यांमध्ये आगामी काळातील होऊ घातलेल्या निवडणूका मोठ्या ताकदीने लढवणार असून गेवराई तालुक्यातील वंचितच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईच्छूक उमेदवारांनी मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी हजर रहावे असे आवाहन वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.