दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सलमान -नसीम अत्तार.
• ओबीसी आरक्षणा सह एकूण 14 सदस्य पदासाठी निघाली सोडत
बुलडाणा, 28 जुलै ः बुलडाणा पंचायत समितीच्या सर्वत्रिक निवडणूक 2022 करिता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण व ना.मा.प्र महिलांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली. तहसीलदार रुपेश खंदारे व निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. आरक्षण सोडत खालीलप्रमाणे आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
मासरूळ – नामाप्र महिला
देऊळघाट – नामाप्र महिला
डोंगर खंडाळा – नामाप्र सर्व साधारण
ढालसावगी – एस सी महिला
रायपुर – एस सी महिला
सातगावं म्हसला – एस सी सर्वसाधारण
येळगाव – एस टी महिला
सागवन – सर्वसाधारण
सावळा – सर्वसाधारण
साखळी बु – सर्वसाधारण महिला
धाड – सर्वसाधारण
चांडोळ – सर्वसाधारण
पिपळगाव सराई – सर्वसाधारण
दहीद बु – सर्वसाधारण महिला
निवडणूक आयोगाच्या निकषानुसार सदरची आरक्षण सोडत काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंदारे यांनी यावेळी दिली.
●●●●●●●●●■■●●●●●●●●●
