
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर– दि.३०/०७/२०२२ आज रोजी अहमदपूर येथील सानवी मंगल कार्यालय येथे माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिला युवक मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.
यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गणेश दादा हाके, भारत भाऊ चामे, सांब तात्या महाजन, बालाजी रेड्डी दिलीपराव देशमुख, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज मुन्ना कांबळे, निखिल कासनाळे उमाकांत कासनाळे, गोविंद गिरी, राहुल शिवपुजे, किशोर कोरे, अमित रेड्डी, लखन गायकवाड, समाधान गायकवाड, आदित्य गुळवे, सुधीर बेल्लाळे इत्यादीने परिश्रम घेतले .