
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील न.पा. कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संदीप दमकोडवार, नगरसेवक नबी शेख, हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे, संजय चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, वसुली अधिकारी माधव पवार, पत्रकार केशव पाटील पवार,, पत्रकार बाळासाहेब कतुरे,गुलाम शेख, लेखापाल जगताप, अभियंता नाईक, विष्णू भिसे आदी उपस्थित होते सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन केले.