
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनीधी- संतोष मंनधरने
देगलूर: देगलूर येथील परमपूज्य जवळकर प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दमन देगावकर, व कार्यक्रमाचे वक्ते :-सौ.अश्विनी कदम ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गायलेल्या पोवाड्यांच सादरीकरण केलं, आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांनी केलेल्या कार्यावर अधारीत विद्यार्थींनी भाषणे-ही केली. त्यानंतर सौ. तोटावार बाई यांनी पद्य सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्या सौ. कदम बाई यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळकांच्या जीवनातील विविध प्रकारच्या प्रसंगातून त्यांच्यातील देश अभिमान, व देशाप्रती असलेली आस्था ,ही प्रत्येक वेक्तीला आदर्शवादी ठरते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करून. इंग्रजांना सळो की पळो करून , भारत सोडून जाण्यास भाग पाडणारे, आणि सर्व भारतीयांमध्ये देश अभिमान जागृत करण्यासाठी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. अण्णा भाऊ साठे यांनी दिड दिवसांची शाळा करूनसुद्धा एक जगासमोर आदर्श ठेवला आहे. एवढेच नव्हे तर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक पोवाडे, व कादंबरींचे विपुल असे लेखन केले आहेत. असे भाषणातून सांगितले. अध्यक्षीय समारोपात देगावकर सरांनी विद्यार्थींना परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीचा सामना करून यशस्वी होण्यासाठी अश्या थोर पुरुषांच्या कार्यांचा आदर्श घेतला पाहिजे… असे सांगून अध्यक्षीय समारोप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. रूपा पांचारे यांनी केले. हा कार्यक्रम ज्ञानोपासक मंडळा अंतर्गत घेण्यात आला…कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले…