
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -रामेश्वर केरे
बार्टी पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे या संस्थे मार्फत राज्यातील एम.फिल पी. एचडी संशोधक विद्यार्थ्याना अधिछात्रवृत्ती देण्यात येते.परंतु बार्टी संस्थेने २०२१-२०२२ या दोन शैक्षणिक वर्षात एम.फिल, पी.एचडी साठी विद्यापिठात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप अधिछात्रवृत्तीची जाहिरात काढली नाही त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नारळी बाग औरंगाबाद येथे आले असता संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन फेलोशिप जाहिरात सात दिवसात काढावी अन्यथा राज्यातील विद्यापिठात एम.फिल, पि.एचडी करत असलेल्या विद्यार्थ्यामार्फत बार्टी कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात येईल.अशा मागणीचे ५० विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात देण्यात आले या वेळी मुख्यमंत्र्यांनी रखडलेली फेलोशिप जाहिरात काढण्यात येईल व तसेच बार्टी संस्थे बरोबरच सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थाना निधी कमी पडू दिला जाणारं नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संशोधक विद्यार्थ्याना दिले.
निवेदनात म्हंटले आहे गेल्या अनेक महिन्या पासुन बार्टी संस्थेने एम.फिल, पी.एचडी फेलोशिप जाहिरात काढावी या साठी आम्ही विद्यार्थी बार्टी संस्थे कडे कॉलिंग, मेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठपुरावा करतं आहोत अनेक निवेदनने पाठवली परंतु बार्टी प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही एकीकडे सारथी संस्थेने २०२२ आणि महाज्योती या संस्थेने २०२२ या शैक्षणिक वर्षातील एम.फिल, पी. एचडी साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप जाहिरात काढली आणि प्रक्रिया आता लवकरच फेलोशिप पात्र विद्यार्थ्यांची यादी ही प्रकाशित करण्यात येणार आहे. तर दुसरी कडे बार्टी संस्थने अद्याप २०२१-२२ या दोन शैक्षणिक वर्षाची अधिछात्रवृत्तीची जाहिरात अजून काढली नाही बार्टी संस्थाच का आम्हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर दर वर्षी अन्याय करत आहे ? सारथी आणि महाज्योती संस्थे प्रमाणे का विद्यार्थी हिताचे निर्णय घेत नाही ? फेलोशिप जाहिराती साठी प्रत्येक वेळी आम्हा विद्यार्थ्याना लढावं लागते.यामुळे आमच्या उच्च शिक्षणावर परिणाम होतो आम्ही विद्यार्थी शेतकरी,शेत मजूर कुटुंबातील आहोत जर बार्टी संस्थेने फेलोशिप जाहिरात काढली नाही तर वाढत्या महागाईमुळे आम्ही विद्यार्थी एम.फिल, पि.एचडीचे संशोधन कार्य करू शकणार नाही असे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे. यावेळी गणेश धांडे संदीप कांबळे प्रभू राऊत, संदीप कांबळे, विश्वास ढोबळे उषा परघणे,रूपाली भिंगारे अशा ५० विद्यार्थ्यांची सह्या आहेत. तसेच सारथी आणि महाज्योती संस्थे प्रमाणे सरसकट सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिप साठी निवड करण्यात यावी. आणि २०१९-२०२० या दोन शैक्षणिक वर्षातील एम.फिल पी.एचडी संशोधक विद्यार्थ्यांचा तिसऱ्या प्रगती अहवालचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी पूर्ण झाला त्यामुळे बार्टी संस्थेने विद्यार्थ्यांकडून प्रगती अहवाल बोलऊन विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ फेलोशिपची रक्कम वितरित करण्यात यावी.अशा निवेदनातून विद्यार्थ्यांनी इतर मागण्या इतर मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.