
दैनिक चालू वार्ता पालघर जिल्हा प्रतिनिधी –प्रा .मिलिंद खरात
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप अंतर्गत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा, केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी जिल्हा ठाणे येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले
प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेला सहशिक्षक अशोक गायकवाड व मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले
सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांचा नावाचा जयघोष केला.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांचे जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन केले
इयत्ता 4 थी चा विद्यार्थी श्लोक मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विषयी मनोगत सादर केले
सर्व विद्यार्थांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.
या जयंती प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट देऊन तोंड गोड केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.