
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
गुन्हे शोध पथक(क्राइम ब्रॅंच) लोणीकंद पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी माननीय बाळासाहेब सकाटे साहेब यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध धंदे, अवैध दारू बंदी,वाढती गुन्हेगारी बंद करून संपूर्ण लोणीकंद पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात शांतता कायम केलीत.
झगडे-भांडण या सारखे प्रकरणे कोर्ट-कचेरी पर्यंत जावू न देता त्यांना समज देवून मिटविण्यासाठी ऊतम कार्य केलेत.
या बद्दल त्यांच्या कर्तव्याची पावती म्हणून व समोरील कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गजानन पवार साहेब, क्राईम पाटील साहेब व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सकाटे यांना शाल देवून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.