
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ श्रीराम मंदिर या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून चालू वर्षाची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली आहे.मंडळाच्या अध्यक्षपदी हर्षद मेघापुरिया तर उपाध्यक्ष प्रसाद अहिरे व कल्पना शिरसाठ याची संयुक्त निवड झाली आहे.सचिवपदी सूरज वाघ,सहसचिव ऋतुजा करमरकर,खजिनदार मनोज पवार सहखजिनदार अभिषेक यादव अशी नवीन वर्षाची कार्यकारिणी मंडळची निवड सर्वानुमते करण्यात आली असून असून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतांना सुरवातीला नवीन कार्यकारिणी बैठकीच्या वेळी गणरायाच्या पद्मपूजेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते,नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षद मेघपुरिय यांच्या हस्ते पद्मपूजन करण्यात आले.