
दैनिक चालू वार्ता पिंपरी प्रतिनिधी -परमेश्वर वाव्हळ
पुणे:युवा सेनाप्रमुख माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कात्रज पुण्यनगरीत जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या जनसंवाद यात्रेला प्रमुख उपस्थिती म्हणून नीलमताई गोरे उपसभापती, आमदार सचिन आहेर, विनायक राऊत ,महादेव बाबर, सुषमाताई अंधारे उपनेत्या शिवसेना ,पुणे शहर प्रमुख संजय मोरे ,सचिन चांदेरे, गजानन कोडे, आदित्य शिरोडकर शशिकांत सुतार, बाळा ओसवाल नगरसेविका कल्पनाताई थोरवे वैद्यकीय पुणे जिल्हा संघटिका ,अध्यक्ष राजमाता प्रतिष्ठान ,शिव अंगणवाडी पुणे जिल्हा संघटिका ,महिला संपर्क संघटिका शिवसेना पुणे ,व संभाजी राजे थोरवे समाजरत्न व ज्येष्ठविधीतज्ञ शिवसेना समन्वयक पुणे शहर,सत्या फाउंडेशन अध्यक्षा गीतांजली ताई जाधव, झेप फाउंडेशन संस्थापक /अध्यक्ष कांता भाऊ राठोड , कल्पना पवार यांच्या सह अनेक मान्यवर व जनसमुदाय उपस्थित होता.
आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून शिवसेना विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली व लोकांना शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे आवाहन केले. दरम्यान जनसंवाद यात्रेचे आयोजन शिवसेना व युवा सेना पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले होते.