
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी नाशिक- संभाजी गोसावी
काही महिन्यांपूर्वीच नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदी विराजमान झालेले रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यांत आली तर त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची मनपाच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यांत आली. मार्च २०२२ मध्ये रमेश पवार यांची नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु अवघ्या चार महिन्यांत त्यांची बदली करण्यांत आली पवार यांच्या जागी आता महारांष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली अवघ्या चार महिन्यांतच पवार यांची बदली झाल्यांने आश्चर्य व्यक्त होत आहे. रमेश पवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्यांचे सांगण्यात येत आहे त्यामुळे काही काळ मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी होते. त्यानंतर ठाकरे सरकारांने त्यांची नाशिकला बदली केली होती. परंतु शिंदे सरकारांने पुन्हा हा निर्णय घेतल्यांने ठाकरे सरकारांला दणका दिल्यांचे बोलले जात आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे २००८ मधील आयएएस अधिकारी आहेत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ येथे सह व्यवस्थापकीय म्हणून कार्यरत होते. शिवाय पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यांचे बोलले जात आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशावरुन नाशिकच्या नव्या मनपा आयुक्तांनी आपला पदभार स्वीकारला. तर मावळते मनपा आयुक्त रमेश पवार यांनी कोणाकडेही पदभार न देता पवार हे पुढील पदभार स्वीकारण्यासांठी ते मुंबईकडे रवाना झाले.