
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील ईट येथे AISF ईट शाखेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा जगाच्या पाठीवर रशिया देशात गाणारे, अलुतेदार, बारा बलुतेदार, अठरापगड जातीचे व्यथा आपल्या साहित्यातून जगासमोर मांडणारे लोकशाहीर, संयुक्त चळवळीतील अग्रेसर नेते, ज्यांनी शाळेत कधी एक अक्षर नाही गिरवलं, पण खुद्द इतिहासाला त्यांच्या कर्तृत्वाचे धडे गिरवायला भाग पाडलं असे सत्यशोधक, लोकशाहीर, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त AISF ईट शाखा समविचारी संघटनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण दादा रणबागुल ,AISF उस्मानाबाद जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड अशोक माने यांनी अभिवादन करून, महापुरुषांच्या जयंती नाचून नाही तर वाचून, डोक्यावर नाहीतर डोक्यात घेऊन वैचारिक पध्दतीने साजरी कराव्या असे आवाहन उपस्थित नागरिकांना आपल्या मनोगातून सांगितले.यावेळी ईट गावचे पंच व नागरिक सागर भालेराव,फकिरा दल अध्यक्ष बाबा थोरात,अक्षय कालखैर, सूरज थोरात, विकास खवले, AISF सचिव प्रेम भागवत, मा. अध्यक्ष बाळासाहेब हुंबे, मयूर पवार, आयुब शेख, फैसल काजी, सूरज वेडपाठक, ईट येथील समविचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी,राजकिय मंडळी, नागरिक उपस्थित होते.लोखंडे सर यांनी मार्गदर्शन करून सर्व मान्यवर यांच्या आभार मानले.