
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
सोनखेड:- सोनखेड येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण चे बिजेपी ता.अध्यक्ष सुनील मोरे देशमुख यांनी भव्य किर्तन सोहळा व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित केला होता.यावेळी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली मुडेकर यांचे किर्तन झाले या वेळी व्यासपीठावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील जानापुरी कर,श्रावण पाटील भिलवंडे,तमकुटे,विक्रम कदम सर,कैलास पाटील जानापुरीकर,संतुकराव हंबर्डे, पंजाबराव देशमुख, राजेश पावडे,माधव सावंत,व परीसरातील कार्यकर्ते हजर होते.