
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस लोह्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.कालवश संभाजीराव धुतमल प्रतिष्ठान लोहा च्या वतीने रुग्णांना फळ वाटप तर भाजपा
विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील कदम यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते वाटप व उदघाटन करण्यात आले.
युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोह्यात जागोजागी भव्य सत्कार व फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात आले .प्रवीण पाटील चिखलीकर, त्याच्या सुविद्य पत्नी वैशालीताई चिखलीकर तसेच विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते रुग्णांना कालवश संभाजीराव धुतमल प्रतिष्ठाण चे प्रमुख माजी उप नगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या वतीने आयोजित रुग्णाला फळ वाटप करण्यात आले तर बाळू पाटील कदम बेनाळकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्राणिताताई यांच्या करण्यात आले
नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी सभापती आनंदराव पाटील , उपनगराध्यक्ष दता वाले , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, बालाजी खिल्लारे, नगरसेवक भास्कर पाटील पवार, नारायण येलरवाड, अमोल व्यवहारे, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, बगडेबाई, माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी,प्रवीण धुतमल , सूर्यकांत गायकवाड, अनिल धुतमल, दीपक सूर्यवंशी, बाळा पाटील पवार, निखिल महाबळे, इसाक शेख, प्रसाद पोले, सचिन पाटील जाधव, विजय पाटील पवार, संदीप पाटील पवार, संग्राम पाटील पवार, रुद्रा संगमे, राजू कदम, संजय कदम, तिरुपती कदम, ब्लड बँकेचे नाव, बंडु कदम, रोहन कदम,रुग्णांना फळे वाटप केले
त्यावेळी डॉ अब्दुल बारी डॉ दीपक मोटे, डॉ.बसवराज लोहारे, आदींची उपस्थिती होती.