
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
परभणी : शहरापासून अवघ्या दहा ते बारा कि.मी. अंतरावरील पिंपरी (दे.) ते नवागड-ऊखळी दरम्यानचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. चिखलमय रस्त्याने रहदारी करणा-या विद्यार्थ्यांचा जीव अगदी मेटाकुटीला येत आहे. सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करुन तेथे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. ऊखळद पासून दोन कि.मी.अंतरावर आणि पिंपरी (दे.) पासून अर्धा कि.मी. अंतरादरम्यान नवागड स्थानी दिगंबर जैन धर्मियांचे सुप्रसिद्ध असे जिवावर (मंदीर) आहे. येथे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. त्याशिवाय येथे एक माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज सुध्दा आहे. पिंपरी, बाभळी, जवळा, ऊखळद परिसरातील एकमेव शैक्षणिक संस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याने रहदारीसाठी एकमेव असलेला रस्ता सुध्दा चिखलमय अशा दयनीय अवस्थेत आहे. अवजड दफ्तरे, छत्र्या आदी साहित्य घेऊन पायपीट करतांना याच विद्यार्थ्यांना चिखलाच्या घसरगुंडीतून अगदी जीव मुठीत धरून चालावे लागते. अनेकदा विद्यार्थी पाय घसरुन पडले जातात. परिणामी त्यांची दप्तरे, अंगावरील युनिफॉर्म त्या चिखलात माखली जातात. तशा अवस्थेत त्या विद्यार्थ्यांनी परत घरी जावे तर अभ्यास बुडतो आणि शाळेत गेले तर शिक्षक भारतात. अशा द्विधा अवस्थेतील त्या विद्यार्थ्यांची काय व कशी कुचंबना होतेय, ते त्यांनाच माहित असते. शासन, प्रशासन आणि राजकारणी मंडळींचा हा सारा खेळ होतो परंतु ज्यांना राजकारणाचा आणि ह्या कुटील नीतीचा गंधही नसतो, अशा विद्यार्थ्यांच्या जीवाशी या तिघांपैकी कोणीही कट कारस्थान न करता हक्काच्या सुविधा पुरवाव्यात अशी माफक अपेक्षा असते.
जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या कर्मठ आहेत. त्यांना जशी कर्तव्याची जाणीव आहे किंबहुना तशीच राजकारणी व प्रशासनातील उदासीनताही दिसून आल्याशिवाय राहाणारी नाही. विद्यार्थी जीवनात जर सादर अपेष्टा झेलाव्या लागत असतील तर अभ्यास कसा होणार याचीही त्यांना परिपूर्ण जाण असल्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या प्रकरणाची प्रथम चौकशीचे व नंतर रस्ता दुरुस्तीचे निर्देश तात्काळ देतील यात शंकाच नसावी.