
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा पालघर द्वारा संचालित माहेर लोकसंचालीत साधन केंद्र व पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात महिलांसाठी स्तनाचा कर्करोग या विषयावर डॉ.नयना कनल यांनी मार्गदर्शन केले.
शुक्रवारी (दि.५ऑगस्ट) कंचाड येथील माहेर लोकसंचालित साधन केंद्र येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्या नंतर माविमची प्रार्थना घेण्यात आली व उपस्थित पाहुण्यांचा स्वागत, सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तर माहेर cmrc च्या वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक निकिता भोईर यांनी केले.
मौलाना आझाद महामंडळाचे शेख सर यानी cmrc चे कार्य व माविम करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
तर सेंट जॉन कॉलेज मधून आलेले देशमुख यांनी १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना हार्डवेअर, प्लम्बिंग एअर कंडीशनिंग आणि रेफ्रिजरेशन अशा अनेक कोर्सेस बाबत मार्गदर्शन केले.
तसेच पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन च्या फाउंडर नयना कनल यांनी त्या स्वतः ब्रेस्ट कॅन्सर च्या 3 स्टेज पर्यन्त जाऊन आपल्याला झालेले कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला मात करुन कशा प्रकारे बाहेर आल्या याचे त्यानी मनोगत व्यक्त केले व आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी स्वताला कॅन्सरची लगन झाली आहे का हे कसे ओलखावे या बाबत उत्तम मार्गदर्शन केले.