दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून घरासह घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. रविवारी (१ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत घर भस्मसात होऊन गाडेकर कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली असल्याने शेलटे गावातील ए.एन.जे टर्नकी पोजेक्टस प्रा. ली. या कंपनीच्या वतीने त्यांना आर्थिक मदतीचा हाथ दला आहे.
गाडेकर कुटुंबीयांवर इतरही ठिकाणांहून मदत असली तरी कंपनी व्यवस्थापनाने माणुसकीची जाणीव ठेवत
तातडीची आर्थिक मदत म्हणून हेमंत गाडेकर यांना २५ हजार रुपये, आई रुक्मिणी गाडेकर यांना २५ हजार रुपये तर रणधीर गाडेकर हे दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ५० हजार रुपयांची असे एकूण १लाख रूपयांचे धनादेश कंपनीचे डायरेक्टर मघारामजी कुलरीया यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी कंपनीचे उपाध्यक्ष संदेश पाटील, इंजिनिअर उमेश पाटील, अक्षय जाधव, रूतीक गायकवाड, अनिकेत गायकवाड, शेल्टे गावचे सरपंच राजू गायकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोऱ्हेकर यांच्यासह अनेक महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच आग विझवण्यासाठी कंपनीकडून अग्निशमन दलाला तातडीने पाण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल कंपनीचे डायरेक्टर मघाराम कुलरीया तसेच फायर फायटर सिस्टिम चे कर्मचारी निलेश गायकर यांचे ग्रामस्थांडून आभार व्यक्त करण्यात आले.
