
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-संघटक मराठवाडा विभाग_महाराष्ट्र रा प्राध्यापक शिक्षक कर्मचारी संघटना पुणे, सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य संघटक तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बेलगाव पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य कोहिनूर सय्यद यांना 3 ऑगस्ट रोजी सोलापूर येथील प्रसिद्ध मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्यात आदर्श कार्याबद्दल “विशेष पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अंबादास शिंदे, सचिव अशोककुमार दिलपाक , प्रमुख पाहुणे युगिराज वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त आबासाहेब दैठ नकर , भंते संघापल आदी मान्यवर उपस्थित होते.