
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी-प्रा .मिलिंद खरात
वाडा तालुक्यातील गारगाव विभागातील सुतकपाडा ते गावितपाडा रस्त्याची वाईट अवस्था आहे .
सुतकपाडा ते गावित पाडा रस्ता चिखलाचा झाला आहे. शासन रस्ता कधी बनवणार आहे याची आतुरतेने वाट लोक पाहत आहेत .सुतक पाड्यातील लोकांना चिखल तुडवत व शाळेतील मुलांना चिखलातून जावे लागत आहे.येण्या जाण्या साठी आजुबाजूचे दगड लोकांनी जमा करून रस्ता तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला .पण पाऊस पडल्यावर पुन्हा रस्ता चिखलाचा झाला.जर लोक स्वतःच रस्ता करु लागले तर शासन प्रशासन काय करते .असा प्रश्न लोक करत आहेत . अशी दयनीय अवस्था लोकांची व रस्त्यांची आहे.