
दैनिक चालु वार्ता कोरपना प्रतिनिधी -प्रमोद खिरटकर
कोरपना
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक लवकरच लागणार आहे त्यादृष्टीने निवडणुक आयोगाने नियोजन सुरू केले आहे २८ जुलै च्या आरक्षण सोडतीत वनसडी गण हा ओबीसी राखीव निघाल्याने या गणकरीता युवा नेते रोशन आस्वले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे . युवा नेते रोशन आस्वले हे माजी उपसभापती सौ सिंधुताई आस्वले यांचे सुपुत्र आहे . सदर गणातील गावांमध्ये रोशन आस्वले व त्यांच्या परिवाराचा दांडगा जनसंपर्क आहे.
काँग्रेसचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे कट्टर समर्थक म्हणून रोशन आस्वले यांची ओळख आहे त्यामुळे पक्ष विजयी उमेदवार म्हणून रोशन आस्वले यांच्या नावाची जोरदार चर्चा सद्या कोरपना तालुक्यात सुरू आहे.