
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन जनतेला केले असून. त्यामुळे सध्या अनेक वाद घडताहेत, अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाइलवर राष्ट्रध्वंज लावला आहे. सरकारची ध्वंज साहिंता यादीआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी करण्यांत आली आहे.तरी राष्ट्रध्वंज फडकावताना खालील गोष्टी लक्षांत घेणे अतिशय गरजेचे आहे. १) ध्वंज फडकावताना तो फाटलेला,मळालेला किंवा चुरगळलेला नसावा तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा २) भारतांच्या राष्ट्रध्वंजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे. त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही ध्वंज फडकावू नये ३) कोणत्याही प्रकारांच्या सजावटीसाठी ध्वंज वापरु नये ४) ध्वज स्तंभावर किंवा ध्वजांच्या वर फुले, पाने,फुलांचे हार ठेवू नयेत ५) ध्वंजावर काही लिहू नये कोणत्यांही झाकणासाठी त्याचा वापर करू नये ६) ध्वज फडकावताना नारिगी रंगवर राहील याची दक्षता घ्यावी ७) राष्ट्रध्वंज फरशीवर पडलेला नसावा तसेच पाण्यांवर तरंगलेला नसावा ८) जेव्हा ध्वंज फडकावितो तेव्हा तो ध्वंज स्तंभाच्या उजव्या बाजूला असावा ९) ध्वंजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यांत फुले गरज असल्यांस ठेवता येतील १०) कोणत्याही प्रकारांच्या वेशभूषेवर ध्वंजचा वापर करु नये. तुमच्या घरी ध्वंज फडकाविण्यांचा विचार करीत असाल,तर हे नियम नक्की लक्षांत घ्यावेत असे आवाहन पत्रकार श्री. संभाजी गोसावी यांनी केले आहे.