
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
वसई सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील पळशी गावचे एसटी चालक जालिंदर पवार यांचे गेल्या आठ दिवसांपूर्वी पुणे खेडशिवापूर येथे वसई मसवड घेवुन जाणारी एसटी बस बाजूला घेत प्रवासी सुरक्षित ठेवीत त्यांनी आपले प्राण स्टेअरिंगवर सोडले यामुळे बसमधील प्रवाशांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली. सदर घटनेची माहिती वाहक संतोष गवळी यांनी आगर प्रमुख श्री.भोसले यांना दिली. आमच्या डेपोतील विनयशील,प्रामाणिक व्यक्तिमत्व असे आमचे एसटी बसचे चालक जालिंदर पवार यांच्या विषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी जालिंदर यांचा आगार प्रमुख दिलीप भोसले
त्या दिवशी मला जलिंदरचे वाहक श्री. गवळी यांचा फोन आला
मी नसरापूर फाट्याजवळ आहे.जलिंदरला अटॅक
आला आहे.मला जवळच्या एस टी अधिकाऱ्याची मदत हवी
आहे.माझ्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे फोन नं नाहीत.मी त्यांना धीर दिला व प्रथम जवळचा दवाखाना गाठण्याचा सल्ला दिला मात्र दवाखान्यात जाण्यापूर्वीच प्रवाशांना सुरक्षित.ठेऊन जालिंदर ने आपला प्राण सोडला होता.सदरची.खबर प्रथम त्याच्या पत्नीला सांगावी म्हणून हातात.फोन घेतला मात्र एका तरुण भगिनीला काय सांगावे?हे मला क्षणभर सुचेना.
माझे हात थर.थर कापत
होते मी.काय सांगणार होतो त्या मावलीला.की
तुमचा पती आता ह्या जगात नाही.तुम्ही त्यांची वाट पाहू नका.स्थानक
प्रमुखांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला
स्थिर केले..मी म्हणालो
त्यांच्या पत्नी ऐवजी मी दुसऱ्या जवळच्या नातेवाईकास कळवतो.तसे मी आगार
प्रमुख भोर श्री कदम साहेब यांना फोन करून
कळविले होते व ते तातडीने घटनास्थळी
रवानासुधा झाले होते.
मी जलिंदरच्या मेहुण्याना सदरची खबर दिली व तुमच्या परीने तुम्हीच आपल्या बहिणीला काय ते सांगावे?अशी विनंती केली. व काही अडचण
आल्यास मला कधीही फोन करा असे विनम्र पणे सांगितले. व तातडीचे अर्थसाहाय्य माझ्याकडुन वेळेत पोहचणार नाही हे लक्षात येताच श्री कदम
साहेब यांना ते देण्याची
विनंती केली.त्यांनी ते तातडीने दिले.
जालिंदरने एप्रिल ते जुलै
या चार महिन्यात फक्त
एकदाच रजा घेतली होती. व एकही दिवस
तो गैरहजर नाही.मला
नेहमी म्हणायचा साहेब
संपामुळे प्रवाशी दुरावलाय हो आपला
तो.अत्यंत विनम्र व मितभाषी होता. संपात
आपला डेपो चालू होता
तेव्हा मी कामावर आलो
असतो तर कर्जबाजारी
झालो नसतो.असे तो
मला नेहमी म्हणायचां
त्याचे एस टी वर खूप
प्रेम होते. प्रवाशांशी
वरिष्ठांशी नेहमी विनम्रपणे वागायचा.कधीही प्रवाशी तक्रार नाही.कामगिरीवर वेळेत
हजर असायचा . मर्गफलक स्वच्छ पुसून
मगच गाडीला लावायचा
असा माझा गुणवान कर्मचारी मला पुन्हा कधीही दिसणार नाही
याची खंत माझ्या मनाला नेहमीच लागणार
आहे.परमेश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती लोभो.