
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी -प्रा. अंगद कांबळे
ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित असलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा या शाखेवर डॉ.बापूजी साळुंखे यांची 35 वी स्मृतिदिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री समीरजी बनकर चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी यांनी यावेळी बापूजींनी संस्कारकेंद्र ग्रामीण भागात स्थापन करून खूप मोठे भाग्याचे काम केले आहे असे विचार व्यक्त केले यावेळी शिक्षक ,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सविता मॅडम यांनी केले.तसेच ईश्वरी बनकर,सिद्धी बनकर,समरीन शहा, सलोनी ,अथर्व गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .तसेच सूर्यवंशी सर यांनी सुसंस्कार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे आभार श्री गायकवाड सर यांनी मानले