
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:-रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी साई मल्हार कराटे डो-
असोसिएशन ऑफ इंडिया आणि साई मल्हार इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव चौफुला या ठिकाणी जय संघर्ष संस्था प्रणीत जय संघर्ष वाहन चालक ,चालक मालक संघटनेच्या उपस्थीत सदस्य व पदाधीकारी यांचेकडे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.असे आयोजक प्रा. कैलास महानोर यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी हाळनोर साहेब उद्घाटक आनंद दादा थोरात यांनी केले. स्वागताध्यक्ष तानाजी तात्या केकान यांनी भूषविले.
या कार्यक्रमांमध्ये आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार चंद्रकांत राहीज- अहमदनगर, तुषार अवस्त्री- लातूर, सुनील खताळ- सातारा ,सागर आदमाने – संतोष सोनवणे- पुणे, जयश्री पांडकर- बीड, कविता दवणे- सांगली,व तसेच कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक कार्यात काम करणाऱ्या मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन आनंदा थोरात यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. मानकरी सचिन शिंदे ,सुनील नेटके, डॉ. नवनाथ अडसूळ, संजयजी हाळनोर, स्वप्निल भागवत, उज्वलाताई गोंड, तानाजी केकान यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सचिन भांडवलकर, अर्चना पाटील, डॉ.नवनाथ अडसूळ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास महानोर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सचिन राऊत यांनी मानले.
जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांचेसह आलेले श्री लक्ष्मण शेंडगे,अब्बास खान,सुनिल अप्पा लिंगायत व पत्रकार श्री रविंद्र सुरडकर व आतीष सोनवणे,राजू जाधव,फैय्याज शेख,सुरेश जगताप,राजू पाटसकर,मारूती मांडके,संतोष मंडले यां सर्वांचे स्वागत करण्यात आले.