
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
इंगळी ता हातकणंगले येथील थोरली मशिद व धाकली मशिद म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मशिदमध्ये गेले १० दिवसापासून सुरू असलेल्या मोहरम सणाची हिंदू मुस्लिमसह सर्व भक्तजनांच्या सहभागाने मोहरम सण मोठ्या उत्साहात पार पडला.
इंगळी येथील मोहरम सणाचे खास वैशिष्ठ म्हणजे ताबूत बसवले दिवसापासून पाच दिवसानी दोन्ही मशिद मधील ताबूत पीर खिचडीचा नैवद्य घेणे करीता बाहेर पडतात.तसेच ९व्या दिवशी रात्री नदीवरून अंघोळ करून येतात आणि भली मोठी खाई पेटवली जाते आणि त्यातून पीराचे मानकरी व भक्त त्या पेटलेल्या खाईतून मशिद मध्ये ताबूतचे दर्शन घेतात. पण कुणालाही त्या खाईतील विस्तवाचा धोका पोहचत नाही. हे महात्म आज ही चालू आहे.पहाटेला डोलारा मिरवणूक काढून दोन्ही ताबूत भेटी घेतात.१०व्या दिवशी आबिर उधळून मोठ्या उत्साहात प्रचंड गर्दीत मोहरम सणाची ताबूत विसर्जन कार्यक्रम पार पडला.