दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जळगांव-संभाजी गोसावी
मुक्ताईनगर तालुक्यांतील जवान विपिन खर्च यांच्यावर मंगळवारी दुपारी निमखेडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामांत अखेरची मानवंदना देत मुक्ताईनगर तालुक्यांतील व निमखेडी पंचकोशीतील ग्रामस्थ माता बहिणी मित्रपरिवार यांनी विपिन खर्च यांना दिला तिचा निरोप. निमखेडी येथील मूळ रहिवासी असलेले विपिन खर्च हे भारतीय सैन्य दलात सुभेदार या पदावर ते कार्यरत होते त्यांच्या निधंनाने निमखेडी गावावर शोककळा पसरली. विपिन जनार्दन खर्च यांचे बारावीपर्यंत शिक्षण गावांत झाले त्यानंतर ते लगेचच २ फेब्रुवारी २००० मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले. आग्रा येथे असताना वर्षभरांपूर्वीच सुभेदार या पदावर त्यांची पदोन्नती झाली होती. दरम्यान त्यांच्या सेवेचा कालावधी संपलेला होता मात्र त्यांनी पुन्हा देशसेवेचा कालावधी वाढवून घेतला होता. गावांतून सैन्य दलांत भरती होणारे ते पहिलेच सुपुत्र होते. विपिन खर्च यांच्या पश्चांत आई इंदुबाई, पत्नी रुपाली व दोन मुलै सोया वय ७ तर मुलगा आरव वय ५ तसेच दोन विवाहित बहिणी असा त्यांचा परिवार होता.विपिन हे घरांमध्ये एकुलते एक होते. विपिन खर्च यांच्या पत्नी रुपाली यांचा भाऊ आजारी असल्यांने विपिन हे गेल्या महिन्याभरांपूर्वीच सुट्टी घेवुन घरी आले होते. ही त्यांची कुटुंबाची अखेरची भेट ठरेल असे त्यांच्या मनातही वाटले नव्हते.विपिन खर्च यांना निरोप देण्यांसाठी व त्यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेण्यासांठी जळगाव जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच राजकीय,सामाजिक शैक्षणिक अशा विविध पदाधिकाऱ्यांचे यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व तहसीलदार श्वेंता संचेती,मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक राहुल शेळके यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विपिन यांच्या पार्थिवांचे अंतदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी विपिन यांचा पाच वर्षाचा मुलगा आरव यांने पार्थिवांस भडांग्नी दिला यावेळी कुटुंबांनी एकच आक्रोंश केला यावेळी उपस्थिंतांचेही डोळे पाणविले.
