
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे मानवी साखळी कार्यक्रम घेण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र्य मिऴून 75 वर्ष झाली. याच महूर्तावर देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जाणार आहे.
हर घर तिरंगा उपक्रमात नागरिकांना त्यांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खासगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणीक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज स्वइच्छेने हर घर तिरंगा उभारता येणार आहे.
नागरिकांनी यात जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिक शिवाजी महिला शाळेतील विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत पवार उपाध्यक्ष गणेश बुद्रुक तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री एम .डी . बट्टलवाड यांनी उपस्थित नागरिकांना हर घर तिरंगा ह्या विषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमंगले मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.