
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
जालना जिल्ह्यांतील परतुर तालुक्यांतील वैजनाथ गावच्या सुकन्या आणि समाज प्रबोधन भागवताचार्य सौ. ह. भ .प. रुपालीताई सवणे यांचा जीवन प्रवास रुपालीताई यांचा जन्म २१ जून १९९५ साली टाकळी (अंबड) येथे झाला. बाल वयात आणि शालेय जीवनांमध्ये शिक्षण घेत असताना हरी नामांचा जप घरात जपत. महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली ह. भ. प. रुपालीताई यांचे वडील राजेंद्र मुरलीधर नरके हे वारकरी घराण्यातील असल्याने ह.भ.प .रुपाली ताईंवर घरांतूनच अध्यात्मांच्या संस्कारांचे बीजरोपण तयार झाले. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण माध्यमिक शिक्षण गावात झाले पुढे पदवीधर शिक्षण हे पैठण येथे झाले शालेय शिक्षण घेत असताना भाषणांची आवड असल्यांने ह.भ.प रुपालीताई शाळेत असताना तालुका स्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये असंख्ये पारितोषक त्यांनी मिळवली. लेक वाचवा लेक शिकवा, झाडे जगवा, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ असे या असंख्ये सारखे विषयी रुपालीताई भाषण करुन जनजागृती करु
लागल्या. कमी वयात कर्तुत्व पाहून तत्कालीन सरकारमध्ये शिक्षण मंत्री असताना मान्यनीय.राजेश टोम्पे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यांत आला होता. तसेच सामाजिक, फाउंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ झाले होते. भाषणांची शैली व कला पाहून घरांतून वारकरी संप्रदायांचे संस्कार असल्यांने कीर्तनांतून समाज प्रबोधन करण्यांचा प्रयत्न करीत वयांच्या १७ वर्षी रुपालीताईनी पहिले कीर्तन केले. समाजातून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत गेला आणि त्यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. वयांच्या २० वर्षी जालना जिल्ह्यांतील परतुर तालुक्यांत (वैजनांथ खुद्द) ह. भ .प .भागवताचार्य रामेश्वर महाराज सवणे यांच्याशी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी रुपालीताईंचा विवाह संपन्न झाला आणि पुन्हा अध्यात्मिक जोडीदारांनी समाज प्रबोधनांला उगारा देत गेले.यादरम्यान त्यांना पती ह.भ.प रामेश्वर महाराज सवणे यांचे चांगलेच मार्गदर्शन मोलाचे ठरले. आज रोजी समाजामध्ये पती-पत्नी म्हणून श्रीमंत भागवत कथा, राम कथा, छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य या कीर्तनांच्या माध्यमांतून महाराष्ट्रांच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यासारख्या इतरही राज्यातही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. कर्तबगार पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो रुपालीताई यांचा कर्तुत्वांचा ठसा त्यांनी चांगलाच निर्माण केला. यामध्ये पती ह .भ .प रामेंश्वर महाराज सवणे यांचा देखील मोलांचा वाटा आहे.आणि आज महाराष्ट्रांच्या संपूर्ण कानाकोपऱ्यांमध्ये पती-पत्नी समाज प्रबोधन व कीर्तनांच्या माध्यमांतून आपली सेवा बजावत आहेत. यावेळी सातारा जिल्ह्यांच्या पत्रकारांनी श्री.गोसावी यांनी रक्षाबंधन निमिंत्त ह.भ.प रुपालीताई यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडूंन त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला. यावेळी सातारांच्या पत्रकारांनी त्यांना आमच्या सातारा जिल्ह्यांत आणि सातारच्या ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यांमध्ये आपली सेवा नक्कीच घडेल असे आग्रहांचे निमंत्रण ह .भ .प रुपालीताई यांना दिले.