
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
नॅशनल हायवेवर नेहमीप्रमाणे तपास करत असताना एका ड्रग्ज तस्कराकडून धक्कादायक माहिती आणि भली मोठी रक्कम हाती लागली आहे. महाराष्ट्राच्या जालन्यानंतर ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. यामध्ये एका मराठी व्यापाराकडून तब्बल १.२२ कोटी रोख रक्कम तर २० सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहेत.
: महाराष्ट्राच्या जालन्यामध्ये इनकम टॅक्स विभागाची आठ दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या कारवाईमध्ये तब्बल ३९० कोटी रुपये जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर आता आणखी एक मोठी कारवाई ओडिसामध्ये करण्यात आली आहे. ओडिसाच्या उत्पादन शुल्क पथकाने गंजम जिल्ह्यामध्ये लांजीपल्ली इथं महाराष्ट्रातल्या एका व्यावसायिकाच्या ताब्यातून मोठी संपत्ती जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाकडून तब्बल १.२२ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली. इतकंच नाहीतर २० सोन्याची बिस्किटही या व्यवसायिकाकडून जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रक्कम या व्यवसायाकडे कशी आली? याचा तपास सध्या पथकाकडून सुरू आहे तर त्याचे