
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बुलडाणा : शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तर विधानपरिषदेत शिवसेनेने विरोधी पक्षनेता केला, त्याला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली