दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
आमचं सरकार हे डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी चांगले करण्यांचा प्रयत्न राहील. येथील भूमिपुत्रांनाही जागा देवुन प्रकाशही दिला.कोयना पुनर्वसनांचा प्रश्नं युद्धपातळीवर सोडविला जाईल असा ठाम आश्वांसन निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव,जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले सातारा ही माझी जन्मभूमी असून,ठाणे (मुंबई) ही माझी कर्मभूमी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी माझ्या जन्मभूमीत प्रथमच आलो. येथील स्वागतांने मी भारावून गेलो जिल्हाविसायांचा मी आभारी आहे. राज्यांतील सरकार, हे शिवसेना-भाजप युतीचे आहे सर्वसामान्य शेतकरी कामगारांचे सरकार आहे त्यामुळे या सरकारकडूंन लोकांच्या अपेक्षा राहणार आहेत. लोकांच्या अपेक्षांना न्याय देण्यांचा माझा नक्कीच प्रयत्न राहील असे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
