दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – “यदा यदाही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत’ या म्हणीप्रमाणे गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला आठवण्याचा सोहळा. आपण राधाकृष्णाच्या अनेक नटखटलीलांनी मंत्रमुग्ध होतो. असाच एक सोहळा म्हणजे कान्हाची माखन हंडी फोडण्याचा उत्सव म्हणजे दहीहंडी.
सह्याद्री शाळेतील नर्सरी व मॉन्टेसरी विभागातील चिमुकल्यांनी शुक्रवार दि. 19/08/2022 रोजी सह्याद्री शाळेच्या प्रांगणात आकर्षक सजावटीसह बाळकृष्ण, राधा व गोप गोपिकेच्या वेशभूषेत मुले नटून आली होती. सर्व वातावरण कृष्णमय झाले होते. अशाच कृष्णमय वातावरणात आकर्षक पाळणा करुन चिमुकल्यांनी कृष्णाष्टमी साजरी केली व दहीहंडी फोडली. कृष्णाच्या नामघोषात दहीहंडी साजरी झाली.
यावेळी सह्याद्री शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे सर , जयश्री शिंदे , मुख्याध्यापक नागेश हिरास , इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदिकिशोर मेकाले , रूक्मिणी डांगे , सुप्रीया वाडेवाले , काशीनाथ पांचाळ , अमोल सिरसाठ , श्रीनिवास बिगर , फिरोज घोडके , राजु पौळ , सह्याद्री शाळेचा पूर्ण स्टाॅप उपस्थित राहुन दहिहंडी सोहळा शाळेतील विद्यार्थासह मोठ्या उत्साहात साजरा केला.
