दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
गडहिंगलज ..दि.१५/८/२२.(डाॅ.सुरेश कुराडे यांजकडून).….गडहिंगलज तालूक्यातील शिप्पूर तर्फ आजरा ग्राम पंचायती मार्फत ध्वजवंदना नंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य गावातील मान्यवरांचा विशेष सत्कार संपन्न झाला .कोरोना कालावधीत कार्यरत असणारे गावात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी पोलीस पाटील , शिक्षकवृद,अंगणवाडी सेविका मदतनिस ,ग्रा.प.कर्मचारी,
शासकिय कर्मचारी व आजी माजी सैनिक,साहित्य शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनिय यश संपादन ग्रामस्थ व शिप्पूर गावातील नागरिकाना कोरोना कालावधीत विशेष सेवा देणारे ग्रामस्थ विविध संस्था पदाधिकारी यांचा कोरोना निवारण संरक्षक योध्दा म्हणून सर्वांचे विशेष सत्कार करण्यात आले.सदरचा समारंभ सरपंच मा सौ.गीतांजली विजय राशिवडे यांचे अध्यक्षतेखाली व उपसरपंच मा जितेंद्र श्रीपती कांबळे पोलीस पाटील मा. सुलभा संतोष पोवार,सदस्य मा.विनायक पांडुरंग शेवाळे,मा. पांडुरंग धोंडीबा राशिवडे,मा.सुजाता विजय रायकर,मा.राजश्री सुरेश कोकीतकर,मा.अश्विनी शामराव रायकर,मा.सविता आनंदा शिप्पूरकर ,मुख्याध्यापक मा पन्हाळकर सर तलाठी मा.चंद्रकांत म्हसवेकर साहित्यिक डाॅ.सुरेश कुराडे शिवलिंग दुध सोसायटीचे मा विनोद कृष्णा पाटील ,श्री रामचंद्र कानडे,तानाजी कानडे,बाळू जाधव ,कृष्णा खेडेकर पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते सर्वाचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला सदरच्या समारंभाची प्रस्तावना उपसरपंच मा जितेंद्र कांबळे यानी केले व गावातील जर सर्व आरोग्य अधिकारी सेवक शिक्षकवृंद व शासकिय अधिकारी ग्रामस्थ यानी कोरोना कालावधीत ग्राम पंचायतीला विशेष सहकार्य केल्याने आपण गाव सुरक्षित राखू शकलो हे सारे शिपूरच्या स्थानिक व मुंबईस्थित गावकऱ्यानी सहकार्य केल्याने शक्य झाले असे भावउदगार व्यक्त केले.सदरच्या समारंभात मा विजय राशीवडे यानीही आपले विचार व्यक्त केले.
या ग्राप शिप्पूर तर्फे भव्य सत्कार समारंभात कोरोना संरक्षक १) कोरोना काळातील कार्यरत आरोग्य कर्मचारी….
डाॅ.सुधीर जाधव डाॅ.कांबळे.( खाजगी)
शासकीय आरोग्य अधिकारी डॉ.निकीता मोहाळे व नोडल अधिकारी मा.युवराज नाईक साहेब डाॅ.दावणे साहेब व डॉ.करंबळकर
२)पोलीस पाटील सौ सुलभा संतोष पोवार
३) अंगणवाडी विभाग ….. सेविका… ..सौ.सुनिता दगडू चाळक,सौ.मनिषा दिनकर रायकर मा.संगीता कांबळे
मदतनीस…..रेखा सागर सौ.सुनिता हराळे, गीता कांबळे
४) आजी माजी सैनिक …
श्री युवराज मारुती रायकर ,श्री.श्रीहरी मारुती छंद आजगेकर,श्री बाजीरा नारायण पाटील,श्री बाबूराव कानडे,श्री मधुकर गोविंद केसरकर,श्री मारुती बाळू कांबळे,श्री मारुती आजगेकर,कै.रामचंद्र भैरु केसरकर,कै.गुंडू नरसू नरवडकर,कै.अनंत लक्ष्मण राशिवडे. श्री अमर तानाजी केसरकर,श्री दिनकर दतू हारळे, श्री .प्रकाश रामू केसरकर,श्री सतिश धोंडीबा दळवी ,श्री संदिप शंकर हारळे,श्री सदाशिव दत्तू पाटील,कै.महादेव दत्तू राशिवडे.
५) पोलीस कर्मचारी….
श्री.तानाजी संभाजी हारळे ,श्री विजय रामू पाटील ,श्री दादू रायकर
६) शिक्षण विभाग …मुख्याध्यापक
मा श्री .पन्हाळकर सर ,श्री.निवृत्ती शामराव शेवाळे
श्री.घन:शाम दिलीप सुतार श्रीम.पद्मश्री सुभाष गुरव
७) डॉक्टरेट प्राप्त विशेष सन्मान …साहित्यीक विचारवंत माजी प्राचार्य डॉ.सुरेश कुराडे.व प्रा.डाॅ.नामदेव शंकर हारळे प्रा.डाॅ.अमृता नामदेव हारळे.
८) कर्तव्यनिषठ ग्रा पं कर्मचारी सत्कार ….श्री सखाराम कांबळे,श्री सुभाष पाटील,श्री आप्पा सावंत श्री संदेश राशिवडे
या सर्वांचा भव्य आदरयुक्त सेवाभावी व कृतज्ञता सोहळ्यात सन्मान करण्यात आला अखेरच्या सत्रात शालेय विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला या समारंभाचे नेटके सुत्रसंचलन श्री गोपीनाथ केसरकर यानी तर आभार श्री विजय राशिवडे यानी केले समारंभास विविध संस्था पदाधिकारी ग्रामस्थ विद्याथी उपस्थित होते.
