दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज १२ जुलै १६६० सिद्धी जोहरच्या वेढ्यातून विशाळगडाकडे जाण्यासाठी बाहेर पडलेला मार्ग म्हणजे राज दिंडी राजांची दिंडी या मार्गे गेली होती.म्हणून या मार्गाला राज दिंडी असे म्हटले जाते महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते.
आजही शिवप्रेमी इतिहासप्रेमी याच वाटेने पन्हाळगडावरून विशाळगडला राजांची आठवण म्हणून हजारो मावळे विशाळगडला याच वाटेने चालत जात असतात.
काल रात्री पहाटे चार-पाच वाजता च्या दरम्यान राज दिंडी येथील गडाला संरक्षण देण्यासाठी असलेली तटबंदी कोसळली यामध्ये तटबंदीचे काही मोठे लहान दगड शाडूचे मोठे काही भाग या मुख्य मार्गावर कोसळले असल्यामुळे हा मार्ग आता धोकादायक बनला असून आणखीन तटबंदीचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. सर्वच तटबंदीची दुरावस्था झाली आहे.हा मार्ग वनविभागाच्या अतिरिक्त येत व तटबंदी व वरील भाग हा पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त येतो.सध्या वनविभाग ये-जा करण्यासाठी वापर करत आहे. तसेच त्यांचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गेस्ट हाऊस आहे.काही त्यांचे महत्त्वाचे लोक व्हीआयपी,आमदार,खासदार, पन्हाळागड पाहण्यासाठी आल्यास राहण्यासाठी येत असतात त्यासाठी तिथून तबक उद्यान कडे आजही रस्ता चालूच होता.गडावरील नागरिकांच्या शेतजमीनी खालील वाड्या वस्तीमध्ये असल्यामुळे नागरिक व वाडी वस्तीतील लोक गडावर ये-जा करण्यासाठी पायी या मार्गे येत असतात सध्या वनविभागाने हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. आता हा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे.सदर घटनेची वनविभाग व पुरातत्व विभाग चे अधिकारी विजय चव्हाण यांनी पाहणी केली आहे. वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की .पडलेला तटबंदीचा भाग पाहण्यासाठी व तटबंदीवर जाऊन फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. केव्हाही तटबंदीला चा राहिलेला भाग कोसू शकतो मोठी दुर्घटना होऊ शकते.
शितल गवंडी, स्थानिक रहिवाशी, यांनी दैनिक चालू वार्ताला माहिती देत असताना सांगितले की.”असेच जर किल्ल्याचा रोज-रोज किल्ल्याचा भाग पडत राहिला तर एक दिवस हा किल्ला संपून पडून जाईल व येणाऱ्या लोकांना व येणाऱ्या पिढींना हा किल्ला चित्रात दाखवण्याची वेळ येईल अशी भयानक परिस्थिती झाली आहे, तसेच यावर शासनाने खास करून केंद्र सरकारने लक्ष घालण्याचे फार गरजेचे आहे.”
