दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
दहिवडी ता. माण तालुक्यांतील शिंगणापूर येथील दशनाम गोसावी समाजाच्या दफन भूमीतील काही गोसावी समाजाच्या समाध्यांचे जेसीबीच्या साह्यांने उध्वस्त केल्यांचा प्रकार मागील चार दिवसांपूर्वी शिंगणापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या गलतन मनमानी कारभारांमुळे घडून आला. समाधी घटनास्थळी शिंगणापूरच्या ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच, तलाठी ग्रामसेवक विनापरवाना तेथील रहिवासी गोसावी समाजांतील कुटुंबातील कोणत्याही सदस्यांला ग्रामपंचायत व सरपंच यांनीही कल्पना न देता जेसीबीच्या साह्यांने खोदकाम चालू केले होते. सदरची गोपनीय माहिती तेथील रहिवासी असणाऱ्या किशोर गिरी गोसावी यांना समस्त त्यांनी गोसावी समाजातील सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांना याबाबतची कल्पना तुरी दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता.पुणे सातारा जिल्ह्यांतील अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य बॉडी घटनास्थळी दाखल होऊन शिंगणापूरच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या मनमानी कारभारांला विरोध केला. सदर शिंगणापूर,दहिवडी समाजातील गोसावी बांधव कार्यकर्ते यांच्या उपस्थितीसह पुणे जिल्हा सातारा जिल्ह्यांतील अध्यक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थिंतीत दहिवडी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांत आला. सदर घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर घटनास्थळी भेट दिली. मात्र गोसावी समाज एवढ्यावरच न थांबता शिंगणापूरच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या गलतन कारभारांमुळे समाजांतील पत्रकार संभाजी गोसावी यांना या घटनेची कल्पना देण्यांत आली त्यांनीही त्वरित घटनास्थळी भेट दिली. यावेळी पत्रकार श्री. गोसावी यांनी दहिवडीचे तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह प्रशांत आवटे (महसूल अधिकारी सातारा ) यांच्याशी दूरध्वनीच्या माध्यमांतून संपर्क साधून घटनेबाबत त्वरित माहिती श्री. गोसावी यांनी दिली. व सर्व दशनाम गोसावी समाज बांधवांनी तातडीने कारवाईची करण्यांची मागणी केली. आज सातारा जिल्ह्यातील गोसावी समाजातील अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य कमिटी श्री. क्षेत्र. शिंगणापूर येथील गोसावी मठात घडलेल्या घटनेची पाहणी.यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी, श्रीकांत भारती (खजिनदार) सौ. सुजाता गिरी गोसावी (माजी नगराध्यक्ष सातारा) सौ.मिना गिरी गोसावी (सदस्य) शहाजी गिरी गोसावी (निवृत्त कॅप्टन) उमेश गिरी (सदस्य) राजेंद्र गिरी (उपाध्यक्ष) संभाजी पुरीगोसावी (संपर्क प्रमुख) आदीं गोसावी समाज बांधवांनी श्री. क्षेत्र शिंगणापूर येथील घडलेल्या शिंगणापूरच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या गलतन कारभारांच्या मनमानी कारभारांबाबत घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षांत घेता सातारा जिल्हा गोसावी समाजांतील अध्यक्ष पदाधिकारी संपूर्ण टीमकडुंन घटनेची पाहणी.
