दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी.
दैनिक चालू वार्ता सातारा जिल्ह्यांचे आणि पश्चिम महाराष्ट्र दशनाम गोसावी समाज संस्था आणि महाराष्ट्र प्रादेशिक संघटक समाधी बचाव समितीचे सातारा जिल्ह्यांचे दशनाम गोसावी समाजांचे कर्तव्यदक्ष आणि शांत, मनमिळावू, स्वयंमी असं व्यक्तिमत्व असणाऱ्या आमचे तात्या व आमचे सहकारी जगन्नाथ गिरी गोसावी (तात्या) यांना गोसावी समाज बांधवातील अनेक बांधवांकडूंन तसेच राजकीय,सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतून श्री.जगन्नाथ गिरी गोसावी अध्यक्षांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. श्री. जगन्नाथ गिरी गोसावी हे गेले अनेक वर्षापासून गोसावी समाजातील अध्यक्ष या पदाचा पदभार त्यांनी घेतला असून. त्यांच्या कार्यकाळामध्ये समाजांतील अनेक प्रंबलित प्रश्नं मार्गी लावली, संस्थेच्या मार्फत समाजांतील गोर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्न धान्याचे किट व लागणाऱ्या गरजू वस्तूंचे वाटपही तात्यांनी कोरोना काळात केले होते. तात्यांचे गोसावी समाजांतील बांधवांवर अगदी घर कुटुंबा प्रमुखासारखे सारखे अहोरात्र बारकाईने लक्ष असते. त्यांच्या काही अडचणी किंवा काही समस्या असल्यांस अनेक प्रश्नांना तात्या नेहमीच स्वता: पुढाकार घेवुन त्या विषयासंदर्भात आढावा बैठक घेवुन समाजांतील सर्व पदाधिकारी सदस्य बॉडी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजांतील विषयांना आणि त्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षांत घेवुन तात्या नेहमीच गोसावी समाजांसाठी धावत असतात. तात्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे राहणे साधे शब्दांमध्ये गोडी, प्रेमळ आणि मायाळू असा त्यांचा स्वभाव आहे. गोसावी समाजातील सुखदुःखांच्या प्रसंगालाही ऊन ,वारा पाऊस कशाची तमा न बाळगता तात्या स्वता:नेहमी आवर्जून कार्यक्रम ठिकाणी उपस्थिंत असतात.श्री. जगन्नाथ गिरी गोसावी तात्या यांनी आता ७२ व्या वर्षात पदार्पण केले असून. त्यानिमिंत्त आमच्या जिल्हाध्यक्षांना सर्व गोसावी समाजांच्या बांधवांच्या वतीने तसेच सातारा जिल्हा पोलीस दल तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी तसेच मुख्य संपादक कार्यकारी अधिकारी सर्व सर्व प्रतिनिधी बांधव तुम्हां सर्वांच्या वतीने तात्या तुम्हांला तुमच्या अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या हार्दिक,हार्दिक शुभेच्छा
