
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार विधानसभा मतदारसंघातील बुथ सशक्तीकरण अभियान दौरा नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा कंधार तालुक्यातील लाठ खुर्द, मंगलसांगवी, नंदनवन, औराळ, चिखली येथे दि.३ सप्टेंबर रोजी स्वता: भेट घेऊन नागरिकांच्या समस्या, अडचणी तसेच भारतीय जनता पक्षाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदीजी साहेब यांनी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत. त्या सर्व योजना ,अनुदान, मदत सामान्य माणसापर्यंत पोहोचते आहे की नाही हे सर्व पाहण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार साहेब स्वता: दौरा करणार आहेत. भाजपचे मतदान कशा प्रकारे वाढेल यासाठी ते स्थानिक नागरिक व भाजपा कार्यक्रते यांच्याशी संवाद साधणार आहेत, कोणत्याही प्रकारची उणीव व कमी आहे ते स्थानिक भाजपच्या कार्यक्रत्यांच्या माध्यमातून पुर्ण केली जाणार आहेत. या दौर्यात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री. प्रविण पाटील चिखलीकर साहेब, कंधार तालुका भाजपा अध्यक्ष श्री. भगवान राठोड साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रत्येक गावातील व परीसरातील भाजपचे कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.