
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
आज दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना (मेस्टा) ची राज्य कार्यकारीणीची बैठक पार पडली या बैठकीत सुदर्शन शिंदे यांची इंग्लिश स्कूल ट्रस्टीस असोसिएशन (MESTA) संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सहसंघटक पदी नियुक्ती केली.
मेस्टा या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनेही महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जागा लढवण्यात येणार आसल्याचा ठराव एकमुखाने मंजुर करण्यात आला. महाराष्ट्रात मागील काळात कुठल्याही विधान परीषदेच्या आमदाराने इंग्रजी शाळांच्या संस्थाचालक व शिक्षकांबद्दल एकही मुद्दा उपस्थित केला नाही. किंवा विधान परीषदेत समस्या मांडल्या नाहीत. मागील कोरोना काळात आमच्या शाळांचे व शिक्षकांचे अतोनात हाल झाले याबद्दल चिकार शब्द आमदारांनी काढला नाहीं. परिणामी शाळांच्या समस्या वाढतच गेल्या. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांचे नुकसान झाले. संघटनेने शाळा सुरू करण्यास शासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. तेव्हां कुठं शाळा सूरू झाल्या, नाही तर सरकार झोपेतच होते प्रशासन बिंधास्त होते आता आपण हळू हळू सावरत आहोत.
सरकार विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडवू शकले नाही परिणामी शाळांच्या शिक्षकांचे प्रश्न वाढतच गेले त्यात अनेक शिक्षकांनी आत्महत्या पण केल्या काही शिक्षक तर पगारा विना निवृत्तही झाले, परिपूर्ण शिक्षण घेऊनही अनेक पदवीधर आणि त्यांचे प्रश्न अजूनही सुटू शकले नाहीत. डॉकटर, वकील, इंजनिअर, यांचे देशोधडीला लागले आहेत.
म्हणुन आता संघटनेने ठरविले आहे, महाराष्ट्रात इतक्या शाळा विद्यार्थी आणि पालक यांना सोबत घेऊन शैक्षणिक क्रांती आपणच घडवू शकतो ?
शेवटी सगळ्या प्रश्नांची सोडवणूक राजसत्तेत सहभागी झाल्याशिवाय होत नाही , म्हणून भविष्यात आपल्यालाच आपले प्रश्न घेऊन लढणारा आमदार आपण का निर्माण करू नये ?
ही भूमिका घेऊन सर्व विधान परिषद क्षेत्रात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणूक लढवून आपले प्रश्न आपण स्वतः सोडवणे आणि शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवून देणे हे एकमेव उद्दिष्ट असणार आहे.
असा ठराव आजच्या राज्यकार्यकरिणीच्या बैठकीमध्ये सर्वांनुमते घेण्यात येत आहे.
पुढील ठराव
१) शाळांना स्वतंत्र संरक्षण कायदा करा
२) मालमत्ता कर रद्द करावा
३) व्यवसायीक दराने भरावे लागणारे लाइटबील रद्द करावे
४) रिक्त असलेल्या आरटीई च्या जागा भरण्याची परवानगी द्यावी
५) आरटीईच्या विद्यार्थांचा थकीत फीपरतावा दिल्याशिवाय पुढील प्रवेश देणार नाहीत.
६) इरादा पत्राची अट रद्द करून दर्जावाढ स्थानिक पातळींवरच द्यावी
७) शासन स्तरावर प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावे
८) आरटीई प्रवेशीत विद्यार्थी शिष्यवृत्ती स्पर्धापरीक्षेत सहभागी करून घ्यावे.
९) शाळा सोडण्याचा दाखला अनिवार्य करावा
१०) राज्य , विभागीय व जिल्हा पातळींवर क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रम राबवणार .
११) राज्य पातळींवर इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेणार
१२ ) इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडुन वैद्यकीय मदत मिळवून देणार .
१३) शासना कडुन इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळवून देणार .
१४) चालु शैक्षणिक वर्षात मेस्टाचे महाअधिवेशन दिनांक ४,५,६ जानेवारी २०२३ नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे घेण्यात येणार
१५) १८ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा विभागीय शिक्षण परीषद लोहा जिल्हा नांदेड येथे घेणार आहोत असे नवनिर्वाचीत महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुदर्शन शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी डॅा. संजयराव तायडे पाटील संस्थापक अध्यक्ष प्रा.डॅा.नामदेव दळवी प्रदेशाध्यक्ष डॅा विनोद कुलकर्णी महासचिव प्रा. अनिल असलकर प्रदेश संघटक प्रा मनिष हांडे प्रदेश कोषाध्यक्ष प्रा विजय पवार सर महा. प्रदेशाध्यक्ष प्रा संतोष तांबे महा. प्रदेश शिक्षक विंग डॅा सतिष गोरे महा प्रदेश सचिव प्रा विश्वजित चव्हाण कला क्रीडा व स्पर्धा परीक्षा प्रमुख ,मराठवाडा सरचिटणीस भारत होकर्णे, जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष शिवाजी उमाटे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील टाकळीकर, सचिव राजीव घोडके, सहसचिव महेश कुंटूरकर कोकणे सर यांनी अभिनंदन केले