
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
उपविभागीय अधिकारी नायक साहेब ठाणेदार सत्यजित आमले. महाराष्ट्र राज्य कार्यकारी अभियंता इंदुरीकर व पीडब्ल्यूडी नगरपरिषद कर्मचारी यांच्या माध्यमातून गडचंदूर येथील गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो पण मुख्य मार्केट ते बस स्टॅन्ड पासून जी शोभायात्रा निघतात त्यात पोल वरील वायर मध्ये असल्याने गणेश मंडळांना मोठी तारांबळ निर्माण होते. याच अनुषंगाने याही वर्षी अशीच परिस्थिती निर्माण न होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्ग कामाला लागल्याचे दिसून येत आहे पण येथील मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या स्थगित आहे ऐन काही दिवसातच गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे पण नगरपरिषद व पीडब्ल्यूडी याकडे दुर्लक्ष व कामात विलंब करताना दिसून येत आहेत व काही प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन आपले कामे बजावताना दिसून येतात ठाणेदार आमले साहेब अभियंता इंदुरीकर साहेब यांनी विशेष लक्ष देऊन कामाची पडताळणी केली आहे मधोमध असलेले इलेक्ट्रिक खांब व केबल बाजूला करून गणेश मंडळाला त्रास होवू नये म्हणून त्वरित कामाला सुरुवात केली आहेत पण पीडब्ल्यूडी व नगरपरिषद याकडे मुख्य लक्ष देण्याची गरज असल्याचे गडचांदुर नागरीकाकडुन त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे