दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथिल दि. 30 अॅॉगस्ट रोजी राजी 7 वाजता माणिकप्रभू प्रांगणात प्रथमच भव्य दही हंडी महोत्सव जय भवानी दुर्गा मंडळ व दिलीप पा. सोमपुरे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यात विविध पथक सहभाग नोंदवून भाग घेतली होती. यात प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये रक्कम होती. यात भगवे वादळ, ञिशूळ मंडळ या पथकापैकी माँ दुर्गा मंडळ सहभाग नोंदवून यात प्रथम पारितोषिक माँ दुर्गा मंडळ मन्नेरवारलू समाज बांधव यांनी ५५५५ रुपये बक्षिस मिळविली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण देऊन गौरविण्यात आली. यावेळी सगरोळी परिसरातील नागरिक व चिमुकले मुले हजारोच्या संख्येने युवा तरुण मंडळी डीजेच्या तालावर नाद लावत डान्सचा मनमुराद आनंद लुटत दही हंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची बघ्याची भुमिका दिसत होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिल बोनलावाड नगरपालिका बांधकाम सभापती देगलूर, शिवकुमार बाबणे विविध सोसायटी चेहरमन, कॉग्रेसचे युवानेते शिवराज पा. येसगीकर, रोहित देशमुख प्रकल्प संचालक, सतिष मोतीवार, संजय चिलनोड, व्यंकट गुरुजी बामणे, शिवकुमार कोदळे, सुनिल सन्मुखे, आदी मंडळी उपस्थिती होती. दही हंडी सोहळ्यात श्री गणेश कळकेकर माजी सैनिक व एकनाथ पाटील नांदेड, संतोष कल्लेवार, वसीम शेख हे पंच म्हणून काम पाहिले या तर अन्नदाते श्री भोसले सुरेश पा. यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. दही हंडीचे आयोजन जय भवानी दुर्गा मंडळ व दिलीप पा. सोमपुरे सगरोळी यांच्या वतीने घेण्यात आला.
