
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-मेळघाटातील लाकटू या गावात एका युवक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कृषी मंत्र्यांनी तत्काळ धाव घेऊन या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले.
लाकटू येथे अनिल ठाकरे वय २६ वर्षीय शेतकऱ्याने गावाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली.मेळघाट दौऱ्यावर असतांना या घटनेची माहिती मिळताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ लाकटूकडे धाव घेतली.यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.शासन ठाकरे कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे.त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.