
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
वरोरा ( चंद्रपूर ) येथे दोन चिमुकल्याण मुलांना ठार मारून पित्यांने वर्धा जिल्ह्यांतील गिरड पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये साखरा येथील आत्महत्या केल्यांचे समोर आले वरोरा आणि गिरड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन अस्मित ( ८) व मिस्टी (३) अशी मृत दोन चिमुकल्यांची नावे आहेत. तर संजय श्रीराम कांबळे रा. ( बोर्डा ) असे या पित्यांचे नाव आहे संजय हा खाजगी शिकवणी वर्ग चालवत होता तर त्यांची पत्नी ही शहरांतील एका महाविद्यालयांत लिपिक म्हणून नोकरीला होती. शुक्रवारी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता यावेळी संजयने त्याला घरी परत आणले तर लहानी मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून घरी आली होती. संजयने दोन्ही मुलांना घरात ठेवले सायंकाळी मुलाची आई घरी आली असता तिला दोन्ही मुले बिछान्यांवर निपचित पडलेली दिसली. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. आणि हालचाल बंद होती तिने लगेच शेजारच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयांत आणले तोपर्यंत डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषिंत केले पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. या घटनेनंतर संजय कांबळे हा फरार होता व त्याचा भ्रमणध्वनी बंद येत होता.संजयची मानसिक स्थिती बिघडली होती त्यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्यांच्या मार्गावर होते. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊलं उचलले असावे असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र संजय कांबळेचा वर्धा जिल्ह्यांत मृतदेह आढळून आला. संजयने हे पाऊल आर्थिक विवंचनेतुन उचलले की काय त्यांमध्ये अन्य काही कारणे होती यांचा आता तपास चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील वरोरा आणि गिरड पोलीस तपास करीत आहेत.